नळदुर्ग , दि . ११ : 

 छत्रपती शिवाजी महाराज,  महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप  यांची संयुक्त मध्यवर्ती सार्वजनिक जयंतीनिमित्त  बैठक होवुन  सर्वानुमते  दर्शन शेटगार यांची अध्यक्षपदी तर  उपाध्यक्षपदी आकाश धरणे यांची नावड करण्यात आली.

  राहुल जाधव तर कोषाध्यक्षपदी नवल जाधव सचिवपदी विशाल डुकरे  सहसचिव पदी जमनसींग ठाकूर व प्रसिध्दी प्रमुख  प्रमोद जाधव व नेताजी महाबोले यांची निवड करण्यात आली आहे.


यावर्षी कोरोना महामारीचे सावट अजूनही असल्यामुळे  जयंतीनिमित्त मोटारसायकल रँली व विसर्जन मिरवणुक न काढता धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे एकमताने ठरले आहे. या बैठकीस नगरसेवक बसवराज  धरणे , माजी उपनगराध्यक्ष शरद बागल ,  सरदारसिंग ठाकूर, राजेंद्र काशिद , नवल जाधव,अमीत शेंडगे, प्रविण चव्हाण, प्रशांत माळगे,मारुती घोडके,कैलास घाटे,मंगेश महाबोले, शिवाजी सुरवसे, शिरीष डुकरे, अजय दासकर, बंटी मुळे,सागर कलशेट्टी, विशाल कलशेट्टी व शहरातील  युवक उपस्थित होते.
 
Top