कळंब , दि . ०६

 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तालुका शाखा कळंबच्या वतीने 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची इच्छाशक्ती देवीने द्यावी. यासाठी तुळजापूर येथे  रविवार रोजी  जागरण गोंधळ घालून साकडे घालण्यात आले.


 सर्वप्रथम कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी  सर्व लोकप्रतिनिधी 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून जुनी पेन्शन योजना मिळवून देण्याचे आश्वासन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संघटनेला दिल्याचे यावेळी सांगण्यात आले..


  त्यानंतर तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात कळंब तालुका शाखेच्या वतीने जागरण गोंधळ घालून देवीकडे सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्याची इच्छाशक्ती देवो असे साकडे घालण्यात आले. संघटनेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन तालुक्यातून  शिक्षक या आंदोलनासाठी हजर होते.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्रशांत माने ,कळंब  तालुका अध्यक्ष नारायण बाकले , जिल्हा मुख्य संघटक प्रशांत घुटे , कार्याध्यक्ष सुनील बोरकर, कोषाध्यक्ष दशरथ नथाडे, सरचिटणीस महादेव मेनकुदळे, महिला तालुकाध्यक्ष श्रीमती मुक्ता ढासाळकर  , तालुका प्रसिद्धीप्रमुख कालिदास वनवे, सोशल मीडिया प्रमुख सचिन भांडे, अविनाश खरडकर, प्रदीप यादव ,किरण खरडकर ,महादेव खराडे, सोमनाथ चंदनशिव यांच्यासह  अनेक   शिक्षक सहभागी झाले होते.


 
Top