नळदुर्ग , दि . ०७
नुकतेच कंटेनर व मोटारसायकल आपघातात मृत्यु झालेल्या अर्जुन गोविंद राठोड या विद्यार्थ्यांच्या कुंटूबियाची जि. प. सदस्य प्रकाश राठोड , सोसायटीचे चेअरमन हरिश जाधव यांनी भेट घेवुन सांत्वन केले.
रविवार दि . ६ मार्च रोजी नंदगुल ता. तुळजापूर येथे मयत अर्जुन राठोडच्या कुंटूबियाची जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण , खडकी ता. तुळजापूर येथिल सोसायटीचे चेअरमन हारिश जाधव व रवि राठोड आदीसह बंजारा समाजातील मान्यवरानी भेट देवुन सांत्वन केले.
अर्जुन हा बारावीच्या परीक्षेला मोटारसायकलवरुन जात असताना त्याचे अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तुळजापूर-नळदुर्ग या महामार्गावर गंधोरा शिवारात झाला होता.