काटी , दि . ७
तुळजापूर तालुक्यातील काटीचे रहिवाशी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले दलितमित्र पुरस्कार प्राप्त नंदु सादु बनसोडे यांना देशव्यापी श्रमशक्ती सामाजिक,साहित्यिक पुरस्कार शाल, पूष्पगुच्छ, सनामापत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार गुरुनाथ देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम केशव गोरे स्मारक सभागृह, गोरेगाव मुंबई येथे दि.6 रोजी सायंकाळी 5 वा.संपन्न झाला. याप्रसंगी देवानंद भुवड यांनी नंदु बनसोडे यांच्या सामाजिक,साहित्यिक कार्याचा गौरव करतांना व्यसन मुक्ति,काव्य आदी क्षेत्रातील कार्य व्यापक व निरपेक्ष असून आपण घेतलेला वसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी रामदास गजरे, ओंकार सोनवणे,विलास खानवलकर आदी उपस्थित होते.