नळदुर्ग , दि . ०७

प्रसिद्ध लेखक   दत्ता जोशी यांनी  उमाकांत मिटकर यांच्या समाजनिष्ठ वाटचालीवर लिहिलेल्या डिव्हाईन जस्टिस या पुस्तकास संत गाडगे महाराज साहित्य  वाडःमय  पुरस्कार देण्यात आला.

ओतूर, पुणे येथील संत गाडगे महाराज विचार मंच,संत गाडगेबाबा यांचे विचार व कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे कार्य करते.सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या लिखाणास ही संस्था पुरस्कार देऊन त्यांना पाठबळ देते.
 उमाकांत मिटकर हे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतात.त्यांच्या कामाची दखल घेऊन युनेस्कोच्या पुरस्कारासह,महाराष्ट्र शासनाचा प्रेरणा युवा पुरस्कार व इतर 53 राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरवीले  आहे. सकारात्मक शैलीने लिखाण करणारे लेखक  दत्ता जोशी यांनी  उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.अल्पावधीतच याच्या दोन आवृत्तीचे प्रकाशन झाले आहे.

संत साहित्याच्या अभ्यासिका श्रीमती.प्रेमादीदी भटेवरा ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अंजली सामंत यांच्या हस्ते व संत गाडगे महाराज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष  नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य पुरस्कार देण्यात आला.
सदरील कार्यक्रम ओतूर,पुणे येथे दिनांक 6-3-22 रोजी साहित्य प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला
 
Top