नळदुर्ग , दि . ०८

 घराकडे  निघालेल्या  ऊसतोड कामगारांच्या मोटारसायकलास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण आपघातात एकजण जागीच ठार झाला. तर एकास उपचारासाठी रुग्णालयाकडे  घेवुन जात असताना वाटेत निधन झाले. ही घटना उमरगा तालुक्यातील मुरुम ते सुंदरवाडी पाटी दरम्यान  सोमवार दि . ७ मार्च रोजी राञी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान झाला.


राजेंद्र मोतीराम राठोड,  वय    ४५  व सुरेश शिवाजी चव्हाण वय ३३ , दोघे राहणार आलियाबाद ता. तुळजापूर असे आपघातात  मरण पावलेल्याचे नावे आहेत. 

यातील राजेंद्र राठोड हे ट्रकचालक असुन  सुरेश चव्हाण हा ऊसतोड कामगार आहे. ऊसाची गाडी मुरुम येथिल विठ्ठल साई साखर कारखान्यावर लावुन हे दोघे मोटारसायकल (क्र.एम.एच.२५ एक्यु १५३०) वरुन आलियाबाद ता.तुळजापूर येथिल आपल्या घराकडे येत असतान राञी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राजेंद्र राठोड हा जागीच ठार झाला. तरसुरेश चव्हाण हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात घेवुन जात आसताना वाटेत निधन झाल्याचे जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण , दिलासा संस्थेचे विलास राठोड यानी सांगितले .

मयत राजेंद्र राठोड याच्या पश्चात  आई वडिल ,पत्नी ,दोन मुली , दोन मुले , भाऊ तर सुरेश चव्हाण याच्या पश्चात आई  -वडिल , पत्नी , दोन मुली , एक मुलगा असा परिवार आहे.


 
Top