नळदुर्ग ,दि . ८ :
दि. ८ मार्च, जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुळजापूर पंचायत समिती सभापती सौ. रेणुका इंगोले यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे व उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात करण्यात आला .
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ कविता कलसुरे,सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत , माजी उपसरपंच भिवाजी इंगोले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी उमादेवी मगर, कनिष्ठ सहाय्यक कौसल्या सरडे, कल्पना शिंदे, रूपाली भोपलकर यांच्यासह ग्रामसेविका व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .