तुळजापूर , दि . ८ :
८ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी महीलांना पुष्पगुच्छ व साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
दि. ८ मार्च जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नगर परिषद मधील 50 स्वच्छता कर्मचारी महीलांना पुष्पगुच्छ व साडी भेट देऊन साजरा करण्यात आला, यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, विशाल रोचकरी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीना सोमाजी, विजय कंदले, पंडित जगदाळे, किशोर साठे, सुहास साळुंके, शिवाजी बोधले, गुलचंद व्यवहारे , अभिजित कदम, रत्नदिप भोसले, गिरीश देवळालकर आदी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले , राजेश्वर कदम, दिनेश बागल, बाळासाहेब भोसले,राम चोपदार, सागर पारडे यांनी केले. नगरपरिषद स्वच्छता विभाग प्रमुख दत्ता साळुंके, राजाभाऊ सातपुते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.