.


काटी , दि . ८ :उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार भास्कर पवार व त्यांच्यी दोन मुले युवा शेतकरी विश्वास व विनायक पवार या दोन्ही बंधुनी ग्रीन प्लॅनेट बायो इंटरनॅशनल कंपनीची  सेंद्रीय खते व औषधे आणि वेस्ट डी-कंपोजर, जिवाणू स्लरीचा वापर करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून चार  वर्षा पासून निर्यातक्षम भरघोस उत्पादन घेत आहेत.


 यंदा उत्पादनावरील खर्चाची अपेक्षा तर सोडाच पण द्राक्ष निर्यात करण्याच्या दर्जेचे उत्पादन होईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे वाढलेला किड-रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष निर्यातीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात होत होता. परंतु या दोन बंधूंनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत निर्याती द्राक्ष तयार केले.यावर्षी त्यांनी अत्यंत खराब वातावरण असताना सुध्दा रोगमुक्त व विषमुक्त रिशीड्यू फ्री भरघोस उत्पादन घेतले आहे.त्यांनी सव्वा दोन एकर मध्ये सुपर सोनाका या जातीच्या द्राक्षे 40  टन उत्पादन घेतले असून यावर्षी द्राक्ष दरात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन ही  त्यांना दर  38  रुपये किलो प्रमाणे मिळाला आहे.तसेच त्यांच्या शेती मधील 25 एकर क्षेत्रातील  खरीप व रब्बी हंगामातील कांदा, सोयाबीन, गहू, हरभरा आदी पिकांना नाममात्र रासायनिक खतांचा वापर करून ग्रीन प्लॅनेट बायो इंटरनॅशनलची सेंद्रीय खते,औषधे, जिवाणू स्लरी,व शेणखताचा वापर केल्यामुळे विषमुक्त जोमदार उत्पादन घेत आहेत.सोयाबीन एकरी 18 क्विंटल,कांदा एकरी 250 ते 300 बॅग उच्चांकी उत्पादन घेतले आहे. यासाठी त्यांना वेळोवेळी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे सेंद्रीय शेती मार्गदर्शक बसवराज मसुते, अभिजीत पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.


या दोन्ही युवा शेतकरी बंधूनी शेती मध्ये जास्तीत जास्त सेंद्रीय खते व औषधांचा वापर करून रासायनिक खतांच्या वापर अत्यंत कमी केल्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे खर्चात बचत होईन उत्पादनात भरघोस वाढ होऊन आपल्या परिवाराच्या व समाजाच्या आरोग्यसाठी  बिषमुक उत्पादन घेणे अत्यंत गरजेचे असून यापुढे युवा शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेंद्रीय शेतीकडे वाटचाल करावी व भविष्यात शेंद्रीय शेती शिवाय पर्याय नसून शेंद्रीय शेती पद्धतीचा वापर केला तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या द्राक्ष निर्यातीमधून अधिकचे उत्पन्न मिळेल असा आशावाद विश्वास व विनायक पवार या तामलवाडीतील युवा शेतकरी बंधूनी व्यक्त केला आहे.
 
Top