तुळजापूर दि . ७  :

शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत  लहान गटामधून प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या आयुशी केवटे हिचा रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन संस्कार भारतीचे अध्यक्ष पद्माकर मोकाशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 शिवजन्मोत्सव समिती तुळजापूर आणि संस्कार भारती तुळजापूर, विशाल रोजकरी मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवकालीन वेशभूषा संवाद स्पर्धेमध्ये लहान गटामधून प्रथम पारितोषिक प्राप्त केलेल्या कुमारी आयुषी केवटे हिचा तिचे आई- वडील यांच्या उपस्थितीत पद्माकर मोकाशे, सुधीर महामुनी, महेंद्र कावरे, लालासाहेब मगर, प्रफुल्लकुमार शेटे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात तिने हे प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.
 
Top