तुळजापूर , दि . ०६

 उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रणीत शिक्षक सेवा सहकारी पॅनेलचे सहशिक्षक अनिल सुर्यभान हंगरकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.



 तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जि.प.प्रा.शाळेचे सहशिक्षक अनिल  हंगरकर हे संचालकपदी निवडून आल्याबद्धल त्यांचा तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने  फेटा,शाल,पुष्पहार व तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्मानित  करण्यात आले.


 याप्रसंगी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक जाधव, चेअरमन धनाजी मुळे,माजी चेअरमन दयानंद जवळगावकर,सचिव विठ्ठल गायकवाड, बालाजी माळी,बापू काळे,हर्षवर्धन माळी,प्रकाश राठोड,राहूल जाधव,प्रशांत मिटकर ,निलेश स्वामी,सुनिल सुर्यवंशी,सतेश्वर जाधव,विठ्ठल गायकवाड,आबा कांबळे,सुरेश राऊत,सचिन राऊत,अशोक खडके,प्रशांत गायकवाड,निलकंठ ईटकरी,अभयसिंह जाधव,युवराज पुरी,सर्जे  आदी शिक्षक  उपस्थित होते.
 
Top