उस्मानाबाद , दि . २२
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौजे जेवळी उत्तर ,तालुका लोहारा येथील गट क्रमांक 257 चे कोर्टामध्ये दावा दाखल असून कोर्टाने सदरील गट नंबरचा फेरफार होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्याला नोटीस देऊन सुद्धा अधिकार्याने वशिल्याने फेरफार केले असून संबंधित कर्मचाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांवर गावठी सावकाराचे म्हणणे ऐकून अन्याय केला आहे तरी या संबंधित जोपर्यंत सखोल चौकशी करून न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शेतकरी कुटुंबासह सुरू राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही असे निवेदनात म्हटले आहे .
दोन दिवस उपोषण केल्यानंतर तहसील कार्यालय लोहारा यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आज शेतकरी कुटुंबाने अमरण उपोषण पाठी मागे घेतले आहे . लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा फकीरा ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशारा फकीरा ब्रिगेड संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांनी दिला आहे.
यावेळी नागिनी थोरात महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, श्यामल विश्वनाथ आवळे ,शिल्पा श्रीशैल हावळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी नागिनी थोरात महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, श्यामल विश्वनाथ आवळे ,शिल्पा श्रीशैल हावळे यावेळी उपस्थित होते.