काटी , दि . २२ : 

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे  दि. 22  रोजी  शिवसेना शाखेचे उद्घघाटन व शिवसंपर्क  अभियानाचे भव्य स्वागत करण्यात आले.                                                                                     
     
याप्रसंगी शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे,  उस्मानाबाद  जिल्हाप्रमुख तथा  आमदार कैलास पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे,जिल्हा उपप्रमुख विजयकुमार सस्ते, श्याम पवार, उस्मानाबाद  शहराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तुळजापूर शहराध्यक्ष सुधीर कदम, तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी,रोहित चव्हाण, अक्षय ढोबळे, मुकुंद गायकवाड, विभाग प्रमुख अप्पू राजे गवळी,  तामलवाडी गण प्रमुख अमोल घोटकर, तामलवाडी शाखाप्रमुख कृष्णात शिंदे,एकनाथ गायकवाड,महादेव म्हेत्रे,कृष्णा घोटकर, नागेश घोटकर, ज्ञानेश्वर कदम, चांगदेव हजारे यांच्यासह काटगाव,काटी,काक्रंबा,मंगरूळ ,या जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व नागरिक व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. 


या कार्यक्रमात सर्व नागरिकांशी त्यांच्या समस्या विषयक संवाद साधण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे तामलवाडी गण प्रमुख अमोल घोटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
 
Top