वागदरी , दि . २३ : एस.के.गायकवाड
बुद्धांचे समग्र तत्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभे असल्याचे मत साहित्यिक, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित बौद्ध साहित्य संमेलनात अध्यक्षीय स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरात राज्यस्तरिय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी थोर साहित्यिक उपराकार तथा माजी आमदार ,पद्मश्री लक्ष्मण माने तर संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंगाडे हे होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
आम्ही केवळ भारतीय आहोत या विषयावर आयोजित परिसंवादात बोलताना माजी मंत्री बहुजन रयत परिषदेचे संस्थापक प्रा.लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक या वाक्याने करून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सर्व केवळ भारतीय आहोत असा संदेश दिलेला आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी जि.प.समाजकल्याण सभापती हरीष डावरे म्हणाले की, गोलमेज परिषदेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीयच आहे अशी करून आपण सर्वजण सर्व प्रथम केवळ भारतीय आहोत याची जाणीव करून दिली आहे.
संमेलनाच्या पाठीमागची भुमिका बौद्ध साहित्य परिषदेचे संस्थापक प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी सांगितली . विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनानंतर जि.प.अध्यक्षा आस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीना पुरस्कार प्रदान करून राष्ट्रगीताने या संमेलनाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी डॉ. शंकर वाघमारे, डॉ. बाबासाहेब हिरवे,डॉ. राहुल धाकडे,प्रा.डी.डी.मस्के, माजी सैनिक जयानंद कांबळे, सत्यवान वाघमारे, पत्रकार दयानंद काळुंके,साहित्यिक सुभाष वैरागकर ,भैरवनाथ कानडे , संजय रेणुके, कमलाकर सोनकांबळे, गौतम भाळशंकर , अक्षय कर्डक,शरद चिवे , प्रविण वाघमारे,आदीसह साहित्य रसीक उपस्थित होते.
प्रास्ताविक मारूती बनसोडे , सुत्रसंचलन एस.के.गायकवाड व डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे चंद्रकांत शिंदे, बाबासाहेब बनसोडे, अरुण लोखंडे, उमेश गायकवाड, सचिन कांबळे, पप्पू कांबळे,सिध्दू बनसोडे, शरद बागडे, अजय दुपारगुडे,गोविंद भंडारे,विश्वास रणे,अरूण भांगे,सुनील भांगे,विजय राठोड, विलास सुरवसे,आकाश आडे,ललन ठाकूर यानी परिश्रम घेतले.