चिवरी , दि. ०५
तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी येथे दि,४ रोजी तुळजापूर तहसीलदार यांच्या आदेशानुसार रेशन वाटपाचा शुभारंभ करण्यात आला,
चव्हाणवाडी व धनगरवाडी या गावाला मिळून एकच रेशन दुकान होते. मात्र धनगरवाडी व चव्हाणवाडी हे गटग्रामपंचायत असलेले गाव धनगरवाडी पासून जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्याने रेशन आणण्यासाठी चव्हाणवाडी येथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. हा उपरोक्त प्रश्न लक्षात घेऊन येथील उपसरपंच राम श्रीमंत कदम व येथील ग्रामस्थानी ही समस्या दूर करण्यासाठी वेळोवेळी तहसीलदार पुरवठा आधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावा करून तहसीलदार यांच्या आदेशाने चव्हाणवाडी गावात रेशन वाटप करण्यात आले आहे.
यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक बाबुराव शिवराम चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढुन रेशन वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी धनगरवाडी चव्हाणवाडी गट ग्रामपंचायतीचे सरपंच नागनाथ घोडके, उपसरपंच राम श्रीमंत कदम, ग्रामपंचायत सेवक गुराप्पा आरळे ,रेशन दुकानदार कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक महिला उपस्थित होत्या.या निर्णयामुळे ग्रामस्थामधुन स्वागत व समाधान व्यक्त होत आहे.