नळदुर्ग, दि.२५ :
तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव शिवारात
शेतात ये जा करण्यासाठी नसल्यामुळे एका शेतकऱ्यांचे खरीप व रबी हंगामातील पिकांची रास करून शेतात उघड्यावर ठेवल्याने मागील आठवड्यापूर्वी अवेळी झालेल्या वादळी पावसाने नुकसान झाले आहे. अडीच लाख किमतीचे सोयाबीन व हरभरा भिजले आहे. दरम्यान चार वर्षांपासून तुळजापूर तहसील कार्यालयमध्ये लाल फितीत अडकलेल्या शेत रस्त्याचा प्रश्न रखडत पडलेला आता तरी सुटणार का असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
काशिनाथ शामराव मोटे रा. सिंदगाव ता. तुळजापूर यांची सिदगाव शिवारात शेती गट नंबर २८१ मध्ये चार एकर सहा गुंठे शेत जमीन आहे. या शेतात जाण्या येण्यासाठी वहिवाटीचे रस्ता नसल्याने काशिनाथ मोटे यांना शेतीच्या कामासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सन २०१८ मध्ये शेत रस्ता प्रकरणी मोटे यांनी तुळजापूर तहसील यांच्याकडे अर्ज देऊन रस्ताची मागणी केली. मात्र हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान सन २०२१-२०२२ यावर्षीच्या खरीप व रबी हंगामातील सोयाबीन,हरभरा पिकाची काढणी करून रास करून शेतातच ठेवले होते. मात्र एप्रिल मध्ये झालेल्या वादळी पावसाने सुमारे अडीच लाख रुपयांचे सोयाबीन हरभरा नुकसान झाल्याची तक्रार काशिनाथ मोटे तुळजापूर तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधीताकडे केल्यावरून पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी पावसाळा पूर्वी शेत रस्ता करून झालेल्या सोयाबीन हरभरा नुकसान भरपाई त्वरित मिळण्याची मागणी यावेळी बोलतांना मोटे यांनी केली.