काटी ,दि . २५
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे गुरुवार दि.२१ ते गुरुवार दि.२८ या कालावधीत ग्रामदैवत समाधिस्थ योगी श्री बोधगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज पारायण व कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे.
गुरुवार दि.२१ रोजी हभप काका पाटील महाराज यांचे प्रवचन तर मधुकर गिरी महाराज यांचे कीर्तन, शुक्रवार दि.२२रोजी हभप धर्मराज वाडकर महाराज यांचे प्रवचन तर हभप सागर बोराटे महाराज यांचे कीर्तन, शनिवार दि.२३ रोजी हभप दत्ता मोकाशी महाराज यांचे प्रवचन तर हभप निलेश कोरडे महाराज यांचे कीर्तन, रविवार दि.२४ रोजी आबा लिंगफोडे महाराज यांचे प्रवचन तर हभप बाल चैतन्य महाराज यांचे कीर्तन, सोमवार दि.२५ रोजी हभप अच्युत महाराज यांचे प्रवचन तर हभप ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कीर्तन, मंगळवार दि.२६ रोजी हभप अभिनंदन गायकवाड महाराज यांचे प्रवचन तर हभप अक्रुर साखरे महाराज यांचे कीर्तन, बुधवार दि.२७ रोजी हभप गरड सर यांचे प्रवचन तर हभप ज्ञानेश्वर तांबे महाराज यांचे कीर्तन होणार असून गुरुवार दिनांक २८ रोजी हभप गुरुवर्य प्रभाकर(दादा) बोधले महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.त्यानंत्तर सायंकाळी ७ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे समस्त गावकरी केमवाडी यांनी कळविले आहे.