कळंब , दि .२५: भिकाजी जाधव

कळंब आणि वाशी तालुक्यातील पाच हजार एकल महिलांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी त्यांचा गावनिहाय सर्व्हे करून त्यांना त्या योजना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र लोकविकास मंच आणि पर्याय सामाजिक संस्था काम करणार आहे, असे प्रतिपादन पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक तथा महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष  विश्वनाथ  तोडकर यांनी केले.

  दि. २४ एप्रिल २०२२ रोजी पर्याय संस्था सभागृहात एकल महिलांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते, पुढे बोलताना तोडकरी म्हणाले कि, विधवा, परित्यक्ता, एकल महिलावर होणाऱ्या अन्याय ,अत्याचाराचा विरोध करण्यासाठी आम्ही एकल महिला सोबत उभे राहणार आहोत, एकल महिलांची मुले शिक्षण घेत आहेत, त्यांना घरचा आधार नाही, म्हणून शासनाने एकल महिलांच्या मुलांना पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे, या महिलांना जोडून घेऊन शासनाने उद्योग व्यवसायासाठी अर्थ सहाय्य करावे, प्रधानान्याने यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांची उपजीविका सुरक्षित करावी, यासाठी पर्याय आणि महाराष्ट्र लोकविकास मंच शासनाकडे पाठपुरावा करणार आहे .

या मेळाव्याचे प्रास्ताविक  विलास गोडगे यांनी तर सूत्रसंचालन आश्रुबा गायकवाड यांनी केले, तर एकल महिला संघटनेच्या अध्यक्ष सुनंदा खराटे यांनीही उपस्थित एकल महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कळंब आणि वाशी तालुक्यातील हासेगाव, गौर, एकुर्गा, अंदोरा, करंजकल्ला भाटशिरपूरा, इटकूर, बोरी, नांदगाव, तेरखेडा, पिंपळगाव लिंगी, पानगाव, मस्सा खं., बोर्डा, लाखणगाव या गावातील १५८ एकल महिला उपस्थित होत्या, आभार बालाजी शेंडगे यांनी मानले. 


 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय संस्थेचे राहुल शेलवते, वैभव चोंदे, गीतांजली पांचाळ, नीता भोरे, सविता बांगर, पूजा पाटील, जनाबाई गायकवाड, शितल कुदळे, प्रमिला राख, ज्योती शिंदे यांच्यासह महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top