मुरुम, ता. उमरगा, दि. २५
येथील नेहरू नगर भागातील कारभारी प्लॉटमध्ये राहणाऱ्या कै. शांताबाई सिद्राम साखरे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. २५) दुपारी ४ वाजता राहत्या घरी निधन झाले.
त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती लिंगायत (नारळीमठ) स्मशानभूमी मंगळवारी (ता. २६) रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांच्या त्या मातोश्री होत.