तुळजापूर, दि. २५ :

येथिला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वाणिज्य विभागातील प्रा.अमोद अरविंदराव जोशी यांनी महाराष्ट्र राज्यातील सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना अंतर्गत बँक क्रेडिट व सबसिडीचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे प्रबंध सादर करून पीएचडी मिळवल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर, उपाध्यक्ष संभाजीराव पाटील ( बाभळगावकर ), संचालक बाबुराव चव्हाण संचालक रामचंद्र आलूरे, संचालक डॉ. अभय शहापूरकर,  प्राचार्य डॉ. संजय कोरेकर ,प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अमोद जोशी विद्यापीठाकडे सादर केला आहे. या यशाबद्दल    उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, प्रा. जी व्ही  पाटील, डॉ मंदार गायकवाड, प्रा.पद्माकर राव, प्रा अमर भरगंडे, प्रा राजेंद्र खेदाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची  उपस्थिती होती.
 
Top