काटी ,दि.२४
अलटर्नटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील युवा डॉ . रमेश लबडे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन माजलगाव येथे सन्मानित करण्यात आले.
डॉ. लबडे यांनी ग्रामीण भागात कोरोनाकाळात केलेल्या रुग्णसेवेची दखल घेत असोसिएशन बीड जिल्हा शाखेने त्यांचा हा सन्मान केला. असोसिएशनचे अध्यक्ष माधव हिवाळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते