जळकोट, दि.२४ : 

शाश्वत पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेती फायद्याची होत नाही , याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काचं २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडवणार असून २०२३ पर्यंत रामदरा तलावात २१ टीएमसी पाणी बघायला मिळेल असे  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना सांगितले .


तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या वॉटर एटीएम , पिण्याच्या पाण्याची टाकी , अंडरग्राउंड गटार , मोफत चष्मे वाटप व लोकसहभागातून लावण्यात आलेल्या पिठाची गिरणीसह विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा  खासदार निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या  हस्ते करण्यात आला . यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरून खासदार निंबाळकर बोलत होते.


वागदरी येथे  पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेत पाटील तांडा, खुदावाडी येथील नाईक क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. या खेळाडूंचा  ओमराजे निंबाळकर व  कैलास पाटील यांच्या हस्ते चषक देऊन सन्मान केला . याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला  तर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील व शिवसेना जिल्हा उपप्रमुख कमलाकर  चव्हाण यांचा एकाच हारमध्ये   सन्मान केला.



याप्रसंगी दहिटणा ग्रामपंचायतीचे सरपंच आप्पासाहेब बिराजदार ,  उपसरपंच सोमनाथ गुड्डे,  सरदारसिंग ठाकूर , शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ  गवळी , ज्ञानेश्वर घोडके   , युवा सेनेचे सुनील कदम ,  , ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार , उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके, ग्राहक संरक्षण कक्ष तुळजापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, विकास सुरवसे, संतोष घोडके, अतुल पाटील , रवी दबडे, येवतीचे सरपंच अमोल गवळी, सचिन मोरे, आप्पा मिटकर, आदीसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
 
Top