नळदुर्ग ,दि .२५
तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी येथिल हनुमान मंदिरसमोर सभामंडप बांधकामासाठी आमदार राणाजगजितसिह पाटील यांनी दहा लाखाचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे पञ दिले आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या निधीमधून कुन्सावळी ता. तुळजापूर येथील हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी आमदार राणाजगजीतसिह पाटील यांनी दहा लाख रुपयेचा निधी मंजूर केल्याचे पत्र ग्रामपंचायतशी दिले आहे. कुन्सावळी ग्रामपंचायत सरपंच कविता गायकवाड, ग्रामसेवक सेवक महेश स्वामी, तंटामुक्त अध्यक्ष श्रावण बाळ शिंदे, भजनी मंडळाचे प्रमुख शिवराम शिंदे, षणमुख गायकवाड, लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश माळकुंजे, आदी उपस्थित होते.