तुळजापूर दि २७ : डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिराच्या कळसारोहनच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी तुळजापूर खुर्द येथील माहेरवाशिणी उपस्थित शहरातील प्रमुख मार्गावरून जलयात्रा संपन्न झाली. मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रा. विलास जगदाळे आणि इतर विश्वस्त याप्रसंगी उपस्थित होते.
तुळजापूर खुर्द येथील देवीच्या मंदिरावर कळस बसवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहराच्या प्रमुख मार्गावरून दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांमध्ये जल यात्रा काढण्यात आली यामध्ये तुळजापूर शहरातून उंट, घोडे, भजनी मंडळ, आराधी मंडळ, धनगर ढोल मंडळ, वारूवाले, रथामध्ये कळस ठेवून पापनाश नगर येथून सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भवानी रोड महाद्वार, आर्य चौक, कमान वेस मार्गे तुळजापूर(खुर्द) येथे कळस मिरवणूक काढण्यात आली.
मोठ्या संख्येने महिला वर्गाचा यामध्ये समावेश होता. डोक्यावर जलकुंभ घेऊन महिला यात्रेत सहभागी झाल्या होत्या पापनाश तीर्थ येथील या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी तुळजापूर (खुर्द)येथील नागरिक,महिलां, अबाल वृद्ध व युवक,बालक यांच्या उपस्थित होते. सहभागी झालेल्या सुहासिनी महिलांचा मंदिर संस्थानच्या वतीने खण नारळ देऊन सन्मान करण्यात आला. तुळजापूर खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक आणि तरुण युवक या जले यात्रेमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. संपूर्ण तुळजापूर खुर्द परिसरात यानिमित्ताने धार्मिक वातावरण निर्माण झाली आहे. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामुळे बाहेरून आलेल्या भाविक भक्तांची येथे गर्दी आहे.