तुळजापूर, दि. २७ :

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने सुरू केलेल्या विविध मागण्यांच्या उपोषणाला उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

कोरोना आपत्कालीन परिस्थिती दूर झालेली असल्यामुळे देशभरातील सर्व तीर्थक्षेत्र आणि जनजीवन सुरळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर येथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घालण्यात आलेले निर्बंध तात्काळ उठविण्यात यावे. तुळजाभवानी  देवीचे सर्व कुळधर्म कुलाचार आणि धार्मिक विधी पूर्वी प्रमाणे सुरळीत करण्यात यावेत. या प्रमुख मागणीला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सदर उपोषणाला पाठिंबा असणारे पत्र तुळजापूर तालुका सेवादलाचे तालुका अध्यक्ष तानाजी जाधव यांनी उपोषणस्थळी वाचून दाखवले आणि मधुकराव चव्हाण यांचाही पाठिंबा घोषित केला.

तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे,  माजी अध्यक्ष किशोर गंगणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शाम पवार, शहरप्रमुख सुधीर कदम, स्वीय सहायक दीपक थोरात, पत्रकार डॉ .सतीश महामुनी, यांच्यासह उपोषणाला बसलेले पुजारी बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.

 
Top