नळदुर्ग ,दि.२७
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देण्यात आल्याचे राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
दि.२६ एप्रिल रोजी पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीस राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, अख्तर काझी, नगरसेवक शहेबाज काझी,मुश्ताक कुरेशी, विनायक अहंकारी,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी, जामा मस्जिदचे पेश इमाम हाफेज सय्यद नियामततुल्ला इनामदार,माजी नगरसेवक सुधीर हजारे, सचिन डुकरे, मेनोद्दीन शेख, पांडुरंग पुदाले,अझहर जहागिरदार, एजदानी जहागिरदार, ताजोद्दीन शेख, फुरखान शेख, शरणप्पा कबाडे,आकाश धरणे,संदीप सुरवसे,व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, समीर सुरवसे,शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, अजीत चव्हाण, लतिफ शेख,गणी इनामदार, मुजम्मील पटेल, अखलाक जहागिरदार, आदीजन उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पेश इमाम हाफेज सय्यद नियामततुल्ला इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मधुकरराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले की रमजान महिन्यात उपवासाला फार महत्त्व आहे. मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना अतीशय पवित्र आहे. नळदुर्ग शहरात हिंदु--मुस्लिम बांधवांचे सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे होतात.हिंदु बांधव नवरात्री मध्ये नऊ दिवस कडक उपवास करतात. सर्वच धर्मांमध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व धर्म समभाव ही काँग्रेसची विचारसरणी आजपर्यंत आम्ही जोपासत आलो असल्याचेही यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले.
ही इफ्तार पार्टी यशस्वी होण्यासाठी शोएब काझी, शाहेक काझी, उसेद काझी, इम्रान जहागिरदार, फुरखान शेख,मेनोद्दीन मनियार यांनी परिश्रम घेतले.