जळकोट, दि.२७ :


भारतास स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले तरी राणा प्रतापनगर ,जळकोटवाडी (नळ)(ता. तुळजापूर)येथील नागरीकांना,महिलांना,शालेय विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांना  जळकोटवाडी ,जळकोट येथे ये -जा करण्यासाठी रस्ता नव्हता यामुळे नागरिकांचे हाल होत होते. 

ही समस्या गोरसेना पदाधिकारी यांना लक्षात येताच त्यांनी तहसीलदार, तुळजापूर यांना या संदर्भात निवेदन देऊन रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. 

तहसील प्रशासन यांनी याची तात्काळ दाखल घेत दि.२७ रोजी  स्थळ पंचनामा करण्यात आला.मंडळ अधिकारी पी. एस.भोकरे,तलाठी तात्यासाहेब रूपनर ,माजी सरपंच शिवाजीराव काळे,गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण, सहसचिव कुमार राठोड, तालुकाध्यक्ष राजू चव्हाण,रवी पवार,रवींद्र राठोड,गजेंद्र पवार,दत्तात्रय पवार,गोपीनाथ राठोड, भीमराव चव्हाण,अविनाश राठोड, गणेश राठोड,नेताजी राठोड , नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने केलेल्या तात्काळ कार्यवाही बद्दल नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.
 
Top