नळदुर्ग, दि.२७ :
सोलापूर- हेद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवारून बेकायदेशीर गांजाची कार मधून वाहतूक करताना पोलिसांनी नाकाबंदी करून सुमारे १०२ किलो गांजा किमंत १५ लाख ४३ हजार रुपये
जप्त करुन दोन आरोपींना रंगेहात पकडून नळदुर्ग पोलिसानी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना गांजाची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व इतर पोलीस कर्मचा-यानी महामार्गावरील फुलवाडी ता. तुळजापूर येथील टोलनाकाच्या पुढे सापळा लावला . नळदुर्ग मार्गे सोलापूरकडे जाणारी कारची (क्र. एम एच १२ एन बी २६२९) पोलिसांनी तपासणी केली असता १०२ किलो गांजा किंमत १५ लाख ४३ हजार, ब्रिजा कार किंमत ३ लाख असे मिळून १८ लाख ४३ हजार या मुद्देमालासह आरोपी गणेश नन्नवरे वय ३७, रा. दहिवाडी माढा, तुषार काकडे, वय २६ ,वडापूर ता. इंदापूर यांना अटक केली. ही घटना मंगळवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, साहय्यक पोलीस निरीक्षक सिदेश्वर गोरे, सुधार मोटे, पिराजी तायवडे, यांनी भेट दिली. या मोहिमेत पो.का. शिंदे, मुळे, सगट, जोशी, घंटे, हिंगे, बारकुल, आदि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पुढील तपास साहय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.