नळदुर्ग , दि. २८
रामतीर्थ (नळदुर्ग ,जि. उस्मानाबाद ) येथील प्राचीन व पवित्र ठिकाण असलेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानचे रूपडे बदलत असुन याठिकाणी राज्यासह देशभरातुन दर्शन करण्यासाठी व सेवा करण्याकरिता भाविकांचा ओघ वाढताना दिसुन येत आहे. नुकतेच पद्मश्री श्री अभयचंद्र भाटी यांनी श्री रामतीर्थ मंदिर येथे सेवा दिली आहे. या मंदिरात आठवडयातील दर गुरूवारी सुंदरकांड पठण व आरती होवुन महाप्रसादाचे वाटप तर शनिवारी हानुमान चालीसा, आरतीनंतर उपस्थित भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येते.
श्री रामतीर्थ मंदिरास अर्पण केलेले छत्र आसुन या छत्रा मध्ये आणखी चांदी समाविष्ट करून प्रभू श्रीराम व श्री हनुमान यांच्या मूर्तीवर सुंदर व भव्य नवीन छत्र करण्याचा संकल्प करून महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी आवाहन केल्याने महेशचंद्र प्रदीपकुमार, अत्तापुर हैदराबाद यांनी चांदीचा आशीर्वाद टोप व चांदीचे पंचपाञ,ताट दिले आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक सचिन डुकरे मंदिरचे सेवेकरी बाबुराव राठोड ,बसवराज पाटील हैद्राबाद, संतोष सातपुते पुणे, बलदेव सिंह ठाकुर,किशोर (राजू) सुरवसे वागदरी , गणेश मोरडे ,सुनिल कुलकर्णी, धनराज डुकरे, आलियाबाद ग्रामपंचायत सदस्य विलास राठोड ,लखन भोसले, हनुमान महाराज ओझा मुंबई, सुनिल उकंडे, मारुती पाटील येडोळा, राजेश नागने,पंकज पुदाले,शुभम डुकरे,सचिन भोई,श्रीकांत जाधव आदि भक्तानी श्री राम व श्री हनुमान छत्र करिता चांदी अर्पण केली आहे. ज्या भक्तांना छत्र साठी चांदी अर्पण करावयाची आहे, त्यांनी ९५७९२७३६९९ या मो.नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नुकतेच श्रीराम जन्मोत्सव सोहळा,श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या जल्लोषात भक्तानी साजरा केला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानच्या विकास कामांचा शुभारंभ रामनवमीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असुन यामध्ये मंदिर संरक्षक भिंत, मंदिर परीसरात पेवर ब्लॉक, सभागृह व गार्डन आदी कामे करण्यात येणार आहेत.
दर गुरूवारी सांयकाळी सहा वाजता सुंदरकांड पठण , आरती होवुन महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. दर शनिवारी सकाळी ८.३० वाजता हनुमान चालीसा पठण व आरती करण्यात येत आहे. यावेळी १०८ तुपाचे दीप प्रज्वलित करून व १०८ रुचकीच्या पानाचे हार अर्पण करून प्रसाद दात्याच्या हस्ते श्री हनुमान आरती केली जाते. आरतीनंतर उपस्थित भक्तांना प्रसादाचे वाटप केले जाते. श्री हनुमान व श्रीराम भक्तांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मंदिरात श्री शुक्ला महाराज (मध्यप्रदेश ) हे कायमस्वरुपी सेवेत आहेत.
तिर्थक्षेञ रामतीर्थ येथे प्राचीन रामकुंड असुन येथिल पवित्र जल भक्त आपल्या घरी घेवुन जातात. या निसर्ग रम्य मंदिरात दिल्ली , मुंबई, पुणे , हैद्राबाद , औरंगाबाद , पश्चिम बंगाल , यासह इतर ठिकाणाहुन भाविक वास्तव्यास येवुन सेवा करतात.