तुळजापूर ,दि.२८ डॉ.सतीश महामुनी
तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिराच्या कळसारोहण कार्यक्रम मंगलमय वातावरणात वैदिक मंत्रोच्चारात संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये कळसारोहण कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, युवक नेते जय राजेनिंबाळकर, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, नगरसेवक सुनील रोचकरी, मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रा विलास जगदाळे, सचिव बाबुराव माळी, सराफ व्यापारी अजित नाईक, युवक नेते शरद जगदाळे, राष्ट्रवादीचे नेते गोकुळ शिंदे , गणेश नन्नवरे यांची उपस्थिती होती.
वेदशास्त्रसंपन्न नागेशशास्त्री अंबुलगे,
व राजारामशास्त्री अंबुलगे यांच्यासह इतर ब्रह्मवृंद आणि सकाळपासून मंदिर परिसरात दुर्गा सप्तशती पाठ आणि इतर धार्मिक विधी पार पाडले यानिमित्ताने कुंकुमार्चन संपन्न झाले कळसाचे धान्याधिवास झाल्यानंतर महा आरती संपन्न झाली यानिमित्ताने शंकराचार्य स्वामी संकेश्वर पीठ सच्चिदानंद विद्या नरसिंह भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन अध्यक्ष प्रा. विलास जगदाळे यांनी स्वागत केले. शेकडो महिलांची उपस्थिती यानिमित्ताने होती मंदिर परिसर भगव्या ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला.
अनेक वर्षापासून मंदिराचा कळस बसण्याचे कामकाज झालेले नव्हते हे काम पूर्ण करणे तुळजापूर खुर्द यांचे मोठे उद्दिष्ट होते तुळजापूर शहर आणि परिसरातील दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणी आणि देणगी करून हा धार्मिक उत्सव साजरा केला असल्याची माहिती या प्रसंगी प्रा. विलास जगदाळे यांनी दिली.