इटकळ  दि..२८

दुचाकीच्या अपघातात राम लिंबाजी बागडे वय २४ , रा. शिरगापूर ता. तुळजापूर याचा जागीच मृत्यू झाला तर सौरव पट्टु गायकवाड वय( १६) हा गंभीर जख्मी झाला.हा अपघात सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वर केरुर येथील पेट्रोल पंपा जवळ  दि .२८ रोजी सकाळी १२ वाजणाच्या सुमारास झाला.


गावामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती.किरकोळ साहित्य खरेदीसाठी ते सकाळी शिरगापूर हुन इटकळला आले होते.परत जात असताना त्यांच्या एम एम २५२५ए वाय ७४८५ ह्या गाडीचा  अपघात होऊन त्यावरील राम बागडे यांचा गंभीर जख्मी होऊन जागीच मृत्यू झाला.तर सौरव गायकवाड हा गंभीर जख्मी झाल्याने त्यास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

 
Top