जळकोट, दि.२८

 नळदुर्ग येथील जेष्ठ छायाचित्रकार अशोक मायाचारी यांचे  मंगळवार (दि.२६ एप्रिल ) रोजी  निधन झाले.
त्याना गुरूवार (दि.२८ रोजी) तुळजापूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रत्येकानी कै.मायाचारी त्यांच्या प्रती भावना व्यक्त करून   प्रतिमा पूजन व  शोकसभा घेवून श्रध्दांजली  वाहण्यात आली.


यावेळी  फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण कर्पे, उपाध्यक्ष महेबूब शेख,कोर कमिटी सदस्य प्रसाद देशमुख,संजय कुंभार,रत्नाकर मोकाशे,माजी तालुका अध्यक्ष निजाम शेख,सचिव गणेश जवळगे,शिवानंद नाटेकरी, संतोष व्हटकर,अनिल जाधव,नितीन गायकवाड, अलीम शेख,विश्र्वू बोंगरगे,प्रकाश बेडगे,धनराज साखरे,दिनेश जगताप,युवराज जाधव, ज्ञानेश्वर, कदम,शुभंक मायाचारी, रोहित राठोड   उपस्थित होते.
 
Top