मुरुम दि. २८
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात यात्रा नसल्यामुळे या वर्षी यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी ऊसळली होती. उमरगा तालुक्यात भुसणी येथे ता.१६ ते २३ एप्रिल या काळात हनुमान जयंतीच्या निमित्ताने गाथा पारायण लावण्यात आले होते.
या काळात गावात सकाळी ५ पासून ते रात्री ११ पर्यंत दिवसभर हरिपाठ,भारुडे, कीर्तन असल्याने गावातील व परिसरातील सदभक्ततांनी आपले सर्व कामे थांबवून दिवसभर मंदिरासमोर वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत उपस्थित होते. या काळात सर्व सदभक्तांची सकाळचा नाष्टा, दुपारच जेवण, सध्यांकाळचे जेवण गावातील वेगवेगळ्या सदभक्तामार्फत देण्यात आले. गावातील यात्रा कमिटी, प्रतिष्ठीत व्यक्ती, पदाधिकाऱ्यांनी मिळून यात्रेची नियोजन केल्याने शुक्रवारी ता.२२ रोजी सकाळी ८ वाजता सर्व सदभक्त व महिला व बच्चे कंपनी या सर्वाच्या उपस्थीत गावातून पालकी फेरी काढण्यात आली. गावकऱ्यांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून पालकी दर्शनाचा लाभ घेतला. शनिवार (ता.२३ ) रोजी सकाळी ११ वाजता महेश महाराज माकणीकर यांच्या कीर्तनाने काल्याचा कार्यक्रम पार पडला. या वेळी गाव व परिसरातील भक्तगन मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
महाप्रसादाची व्यवस्था विद्यासागर माणिकप्पा हिरमुखे यांच्यामार्फत करण्यात आली. या यात्रा काळात नियोजनबध्द व्यवस्था असल्यामुळे गाव व परिसरातील सदभक्ताला कुठलाही त्रास न झाल्यामुळे गावकऱ्यांनी यात्रा कमिटीचे कौतुक केले. दुपारनंतर यात्रा कमिटीच्या वतीने कुस्त्याचा फड रंगला. कुस्त्यासाठी परिसर व बाहेरुन पैलवानांनी हजेरी लावली होती. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे यात्राच बंद असल्यामुळे यंदा गाव व परिसरातील सदभक्ता या हनुमान जयंती उपस्थित होते. यात्रेत बाळगोपाळांसाठी वेगवेगळे प्रकारची खेळणी आल्यामुळे या सर्वाचा आनंद बालकांनी घेतला. गावात कीर्तनाला आलेल्या महेश महाराज (माकणीकर) यांना माकणी येथे बांधत असलेल्या मंदिरासाठी मदत म्हणून गावचे सुपुत्र संतोष हिरमुखे यांनी २५ टन सिमेंट देण्याचे जाहीर केले. विद्यासागर हिरमुखे व संजय माळी यांनीही प्रत्यक्ष स्थळाची पहाणी करुन मदत करण्याचे जाहीर केले. गावकऱ्यांनी जास्तीत-जास्त मदत करण्याचे यात्रा कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले.