काटी , दि .२९
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील पर्यावरणवादी सर्वसामान्य शेतकरी मोहन चंद्रहरी शिंदे यांनी सामाजिक कार्याचे भान ठेवून शुक्रवार दि. (29 ) रोजी दुपारी एक वाजता वन्यप्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी पाणवठ्याचा शुभारंभ करण्यात आला.
माजी चेअरमन व कॉग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, कॉग्रेसचे पार्टीचे माजी ग्रामपंचायत सदस्य करीम बेग आदी मान्यवरांच्या हस्ते पाणवठ्याचे उद्घघाटन करण्यात आले.
याप्रसंगी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी ग्रा.प. सदस्य करीम बेग, पत्रकार उमाजी गायकवाड, अहमद पठाण, सुहास साळुंके,मोहन शिंदे, दत्ता देशमुख,अनिल गावढे, सुरेश कैकाडी, धनाजी जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील सर्वसामान्य उत्साही शेतकरी मोहन चंद्रहारी शिंदे यांनी यंदा कडक उन्हाळा जाणवू लागल्याने पाचव्या वर्षी वन्य प्राण्यासाठी पानवठा तयार करून वन्यप्राण्यांसाठी व पक्षांना पिण्याची पाण्याची सोय केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. यावर्षी कडाक्याचा उन्हाळा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत असून नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र ओडे, नाले तलाव कोरडे पडले आहेत. पाण्यावाचून होरपळणारे वन्यप्राणी व पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र सध्या चोहीकडे दिसत आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यात होरपळणार्या वन्यप्राण्यांना व पक्षांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक बांधिलकीची जान ठेवत पर्यावरणवादी शेतकरी मोहन शिंदे यांनी वन्यप्राण्यांसाठी पाचव्या वर्षी पाणवठा तयार करुन पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल काटीसह परिसरातून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.