जळकोट,दि.२९ :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यामार्फत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या पवित्र्य सणाच्यानिमित्ताने प्रतिभा निकेतन विद्यालय ,मुरुम येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील,माजी नगराध्यक्ष रशीद शेख,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मिणियार,सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप,प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,प्रमोद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष अय्युब मासुलदार,श्रीकांत बेंडकाळे,इस्माईल जमादार,माणिकराव राठोड,चंद्रशेखर पवार,मदन पाटील,प्रा.शौकत पटेल,अतिक मुन्शी,याकुब लदाफ,योगेश राठोड, गोविंद पाटील,अँड एस. पी.इनामदार,दत्ता चटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयुब मौलाना व शौकत मौलाना यांनी रमजानची पवित्र प्रार्थना करून रोजा सोडण्यात आला. इफ्तार पार्टीकरिता गौस शेख,अयुब पटेल,प्राचार्य पी.पी.गायकवाड,राहुल वाघ,अतिक अत्तार,गणेश अंबर,सुधीर चव्हाण,उल्हास घुरघुरे,किरण गायकवाड, देवराज संगुळगे,राजू मुल्ला,चाँदपाशा मुल्ला आदिनी पुढाकार घेतला.