नळदुर्ग , दि .२९:

सेवापुर्ती संपली म्हणून गप्प न बसता यापुढे सुध्दा वंचित,गरीब विद्यार्थी,पालक शिक्षकांसाठी आपलं सामाजिक काम चालू ठेवावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव चव्हाण यांनी केले.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अशोक पाटील होते तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, भि.स.हासुरे, गुलाब जाधव,  मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,दिलीप सोमवंशी, डॉ.गणेश राठोड, गटविकास अधिकारी टी.एन.चव्हाण, शेषाद्री भारती,  माणिकराव चव्हाण ,अमृता चव्हाण ,सुरज चव्हाण,उपस्थित होते. 

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मोतीराम चव्हाण यांनी जे प्रयत्न करुन हे युनीट उभा केलेत ते चांगल्या पद्धतीने चालवावे त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले .


कार्यक्रमासाठी बसवराज कवठे, महेश कदम, कृष्णात मोरे, गजेंद्र पाटील,अंकुश लोखंडे, दयानंद राठोड, बसवराज भोंगे,शंकर चव्हाण, अँड, बाबुराव पवार, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जे,काळे, डॉ.वाय. के.चव्हाण,अझर जहागीरदार,नेमिनाथ चव्हाण, सुर्यकांत राठोड, सुनील माने, महादेव सावंत, प्राचार्य संतोष चव्हाण, मुख्याध्यापक विनायक राठोड उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेंद्र गुरव,शरद सुर्यवंशी, कार्ले, कांबळे, पाटील,कोकाटे,दुधभाते, हक्के,ढोले, राठोड ,कदम , चौगुले,लवंग,कुचंगे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top