जळकोट, दि.२९


 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा वसंतराव टोणपे ह्या ३७ वर्षे ९ महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर शिक्षण क्षेत्रातून दि.१मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त  निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


शोभा टोणपे ह्या सध्या जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थी संख्या वाढवून गुणवत्ता टिकवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी अचलेर, केसरजवळगा व उमरगा  येथील जिल्हा परिषद शाळेत सेवा बजावली आहे.दि.१मे रोजी सकाळी १०वा. निरोप समारंभ कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव हे उपस्थित राहणार आहेत. 


या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सभापती रेणुका इंगोले, सरपंच अशोकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी शिवराम वाघमोडे, माजी उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे, उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे, तापी खोरे महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे, शिक्षण विस्ताराधिकारी जी.एन. सर्जे केंद्रप्रमुख अरुण अंगुले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर वाडीकर,सर्व सदस्य, सिद्राम घोडके, संतोष लोखंडे ,दीपक कांबळे ,प्रकाश कांबळे ,मल्लिनाथ स्वामी यांनी केले आहे.
 
Top