वागदरी , दि . २९: एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर,विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,मान्यवरांचा सत्कार, भिमगित गायण व लेझीम संघासह सहवादय भव्य मिरवणूक आशा भरगच्च कार्यक्रमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती दि.२७ व २८ एप्रिल २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठपणा करून शिव भक्तीतुन व्यसन मुक्तीचे सामाजिक कार्य करणारे सुरेश पाटील महाराज, महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर,सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार आदीचा जयंती उत्सव कमिटीच्या वतीने स्वागतपर सत्कार करून विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर आधारित समाज प्रबोधनपर भिमगित गायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे, डि.बी.एन.संस्थेचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, सोमनाथ बनसोडे,जयंती उत्सव कमिटीचे सर्व सदस्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
दि.२८एप्रिल रोजी सकाळी ठिक १० वा. एस.के. जहागीरदार संचलित नळदुर्ग सिटी हाँस्पिटल नळदुर्ग ,सत्यशील सामाजिक संस्था पुणे (वागदरी),व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने येथील जि.प.प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकून ५३ रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी डॉ. ईरफान शेख,आरोग्य कर्मचारी हणमंत हळदे,शैलजा माळगे,मोसिन शेख,प्रशांत डावरे आदीनी आरोग्य तपासणीचे काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन धाडवे यांनी केले तर सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, प्रकाश सुरवसे, जयंती उत्सव कमिटीचे उत्तम झेंडारे, नागनाथ बनसोडे, संदिपान वाघमारे, दत्तू वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, गुरुनाथ वाघमारे, अनिल वाघमारे,सत्यशील सामाजिक संस्थेचे राजेंद्र वाघमारे, परमेश्वर वाघमारे, भारत वाघमारे, पत्रकार किशोर धुमाळ, संतोष वाघमारे, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते सह शिक्षक,विद्यार्थी, ग्रमस्थ, उपस्थित होते. शेवटी सायंकाळी ६.०० वा. आंबेडकरी चळवळीतील नेते प्रमोद कांबळे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उत्तम झेंडारे, सचिव संदिपान वाघमारे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्यदिव्य सहवादय मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. या वेळी इटकळ, देवसिंगा (नळ),केशेगाव,येडोळा,आदी गावातील लेझीम संघाने आपले भारदस्त खेळाचे सादरीकरण करून मिरवणूकीची शोभा वाढविली याप्रसंगी, वागदरी,गुजनूर, नळदुर्ग,व परिसरातील भिम सैनिक ,ग्रामस्थ, महिला युवा कार्यकर्ते उपस्थित होते.