चिवरी ,दि . २९ 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि,२७ रोजी जंगी मिरवणूक काढण्यात आली. भीमनगर मधील प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भीम गीते, लेझीम पथकाने ग्रामस्थांचे लक्ष वेधले . गावात वाजत गाजत ढोल ताशा , हलगी, लेझीम च्या गजरात गावांमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील योगेश बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर भुजबळ सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे सहशिक्षक अनिल गायकवाड , युवा नेते सचिन  बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य किरण चिमणे , वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष नितीन गायकवाड, राम वाघमारे, बिभीषण मिटकरी, सुभाष चिमणे,  जयंती समिती अध्यक्ष सालम चिमणे, उपाध्यक्ष दयानंद सरवदे, सचिव शितल कांबळे,वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष धनराज मिटकरी, आदीसह भीमसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होत.
 
Top