तुळजापूर, दि. १५ :


माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज  पाटील, तालुका कमिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर मगर, नगरसेवक रणजीत इंगळे, उद्योजक आनंद जगताप, युवक नेते लखन पेंदे, तालुका सेवादलाचे अध्यक्ष तानाजी जाधव,  तालुका काँग्रेस लीगल सेल अध्यक्ष ऍड. रामचंद्र ढवळे, विकास हावळे, साहेबराव जाधव,पत्रकार डॉ.सतीश महामुनी, जगदीश कुलकर्णी, विकास तांबे यांच्यासह तालुका कॉंग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष संगीता कदम यांच्याकडून मधुकराव चव्हाण यांचा सत्कार


डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सागर कदम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचा सत्कार संयोजक माजी नगराध्यक्ष सौ संगीता कदम व युवक नेते सागर कदम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन करण्यात आला. 


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तालुका अध्यक्ष अमर मगर, नगरसेवक रणजीत इंगळे,  उद्योजक आनंद जगताप, काँग्रेसचे नेते बाळासाहेब कदम, पत्रकार शुभम कदम, विकास तांबे, यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी तीन वाजेपर्यंत भीमसैनिक आदींची या वेळी रक्तदान कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला
 
Top