तुळजापूर दि १५ 


तुळजापूर शहराचा विकास होण्याच्या अनुषंगाने आगामी काळात आपण काम करणार असून दररोज दोन लाख भाविक दर्शनासाठी आले पाहिजे असे नियोजन करावयाचे आहे आहे असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्ताने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काढले


डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने येथील भीम सैनिकाच्या वतीने नगरसेवक औदुंबर कदम यांच्या  हस्ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सर्व भीमसैनिक व तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास साठी एक कोटी वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ऋणनिर्देश पर सत्कार करण्यात आला.


 याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोजकरी युवक नेते विनोद गंगणे यांचाही सत्कार नगरसेवक औदुंबर कदम यांनी केला याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,  युवक जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर नगरसेवक पंडित जगदाळे नगरसेवक किशोर साठे युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

या सत्काराला उत्तर देताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शहराचा चेहरा बदलण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आपण शासनाच्या योजनांचा प्रभावीपणे वापर करणार असल्याचे सांगितले तसेच बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा साठी सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे याप्रसंगी  सांगितले नगरसेवक औदुंबर कदम यांनी या वेळी प्रास्ताविक करीत असताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज पर्यंत झालेल्या सर्व आमदार महोदयामध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची मदत केली आहे असे सांगितले.



 
Top