जळकोट,दि.२६ :मेघराज किलजे
संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळकोट(ता.तुळजापूर) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जळकोट येथील मानमोडी रस्त्यालगत संत गोरोबा काका यांच्या मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. या मंदिराच्या सभागृहात दि.२८(गुरुवार) रोजी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. या पुण्यतिथीनिमित्त बुधवार (दि.२७)रोजी रात्री हरी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तर गुरुवारी सकाळी नऊ वाजता संत गोरोबा काका यांच्या सार्वजनिक पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सारोळा येथील ह. भ.प. उत्तम महाराज घाटे यांचे सकाळी दहा वाजता कीर्तन होणार असून, त्यानंतर बाबुराव लिंबा कुंभार यांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भीमाशंकर कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, माजी सैनिक राजेंद्र कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार, तम्मा कुंभार, संजय कुंभार, दत्तू कुंभार, परमेश्वर कुंभार, तुकाराम कुंभार, बंडू कुंभार, अमोल कुंभार, सतीश कुंभार, सचिन कुंभार, सुभाष कुंभार, शरणाप्पा कुंभार आदींनी केले आहे.