नळदुर्ग , दि . १७ :
हिंदू विचारधारेचे शक्ती पीठ म्हणजे अणदुर हे गाव असून या विचारधारेला दिशा देण्याचे काम, याच भूमीतुन वारंवार झाले असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सत्संग प्रमुख नागनाथ बोंगरगे यांनी केले. ते हनुमान जयंतीनिमित्त आयोध्या राम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवकांचा अणदुर संघ परिवाराच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक महावीर कंदले ,उमाकांत करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अणदुर ,खुदावाडी व अन्य गावातील दिवंगत कारसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नीलकंठ करपे,नागनाथ बोंगरगे, राजकुमार स्वामी, चंद्रकांत गुड्ड, भालचंद्र चेंडके, देवेंद्र घुगे, मुकेश औटे ,काशिनाथ चौधरी ,राजकुमार गोवे ,प्रसाद तोग्गी या कारसेवकांचा उपस्थित मान्यवराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना नागनाथ बोंगरगे म्हणाले की, स्वर्गीय भुजंगराव घुगे यांच्या कार्यामुळे अनेक राष्ट्रीय नेते अणदुर मध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हा ही लाभला आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच आम्ही मार्गक्रमण करीत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात या सर्व कारसेवकांची आयोध्या वारी केली जाईल असे सांगितले.
याप्रसंगी देवेंद्र घुगे, मुकेश औटे राजकुमार स्वामी, या कारसेवकांनी हनुमान जयंती दिनी ३० वर्षानंतर आमुचा सन्मान केल्याने धन्य झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या,
या कार्यक्रमात किशोर पुजारी शाहूराज मोकाशे,संगमेश्वर पाटील, बापु घुगे,प्रज्योत करपे, ज्ञानेश्वर घुगे म्हाळाप्पा घोडके, मकरंद भालकरे, विवेक करपे, काशीनाथ घुगे,उमाकांत स्वामी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन साहेबराव घुगे यांनी केले.