चिवरी , दि . १५ : 

आजच्या युगात वाढदिवसावर लोक हजारो रुपये खर्च करतात, पण तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक विठ्ठल मारुती होगाडे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत तसेच आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने तसेच  अनाथ मुलांनाही जीवनात आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळावी या हेतूने सोलापूर येथील सोनिया मागासवर्गीय बहुउद्देशीय  महिला शिक्षण संस्था सोलापूर संचलित शांताई अनाथाश्रम येथील मुला-मुलींना खाऊ वाटप करून तसेच रोख पाच हजार रुपये देणगी देऊन आपला वाढदिवस कुटुंबासह साजरा केला.
त्यांच्या  या अनोख्या कार्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
 
Top