चिवरी, दि. १५ :

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समिती अध्यक्षपदी रत्नाकर चिमणे, उपाध्यक्षपदी दयानंद सरवदे,तर सचिवपदी शितल कांबळे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  


ही बैठक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चिमणे, सहशिक्षक अनिल गायकवाड, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष नितीन गायकवाड, मारुती मेंढापूरे, राम वाघमारे, सुभाष चिमणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठक घेण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्ष बाळू गायकवाड, खजिनदार धनराज मिटकरी, सहसचिव प्रेम मिटकरी, यांची निवड करण्यात आली. यावेळी नंदकुमार मेंढापूरे, कुंडलिक बनसोडे,  बिभीषण मिटकरी यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होत.
 
Top