प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यासाठी पालिकेकडे मनसेने केला होता पाठपुरावा,आतापर्यंत १५ लाख पालिकेने केले वितरीत

नळदुर्ग , दि . १८

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेकड़े स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय योजनेतील लाभार्थीना प्रोत्साहनपर ३ हजार रुपये  हप्ता द्यावा ही मागणी लावून धरली होती,त्या मागणीची दखल घेत पालिकेने शौचालय बांधकाम पूर्ण झालेल्या या योजनेतील लाभार्थ्याना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते.

 मनसेच्या पदाधिका-यांनी स्वतः जातीने लक्ष घालत,जवळपास ८०० छापील अर्ज वाटप केले,व जो पर्यंत लाभार्थ्याच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होत नाही, तो पर्यंत संबधित अधिका-यांशी जिल्हा  सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी संपर्क साधत पाठपुरावा केला. अखेर त्या सर्व प्रयत्नाला यश मिळाले असून शौचालय योजनेतील पहिल्या टप्यातील १४३ लाभार्थीच्या बँक खात्यावर पालिकेने यापूर्वीच प्रोत्साहनपर ३ हजार रुपये  अनुदान जमा केले होते. नुकतेच दुसऱ्या टप्यात पालिकेने ३५७ लाभार्थीच्या खात्यावर अनुदान जमा केले आहे,म्हणजेच पालिकेने आता पर्यंत ५०० लाभार्थीना १५ लाख रुपये  या योजनेतील लाभार्थीना वितरीत केले आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळेच या लाभार्थीना प्रोत्साहन अनुदान मिळाल्याने शहरवासियाकडून मनसेच्या पदाधिका-यांचे कौतुक होत आहे.अनेकांनी पदाधिका-यांची भेट घेऊन अभिनंदन करत आभार ही मानले आहे.
 
Top