तुळजापूर, दि १५ :


 नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १चे माजी मुख्याध्यापक कै. दिगंबरराव कावरे गुरुजी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा स्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    या रक्तदान शिबिराचे उद्घाटन  पोलिस प्राधिकरणचे माजी सदस्य उमाकांत मिटकरी, माजी  नगराध्यक्ष जयश्री  कंदले, डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संचालक डॉ. किरण सारडा, डॉ.सुदिप सारडा, नितीन कवठेकर,जनता विद्यालय येडशीच्या  माजी प्राचार्य मीना  इटेवाड (कांबळे), प्रा. सतीश बिडवे ,माजी नगरसेवक अमर  हंगरगेकर, युवा नेते विशाल रोचकरी, माजी नगरसेवक विनोद  पलंगे, ज्येष्ठ पत्रकार ए.टी.पोपळे, जगदीश कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे,  यांच्या हस्ते करण्यात आले. 

महिलांनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवत  असे आव्हान डॉ. किरण सारडा यांनी केले तर तुळजापूर शहरातील रक्तदान चळवळ ही अखंडितपणे चालवण्याचा युवास्पंदन संस्थेने वसा आणि वारसा घेऊन जिल्ह्यातील रुग्णांची सोय केली आहे असे गौरवोद्गार  पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकरी यांनी काढले .

प्रा.सतिश बिडवे यांनी रक्तदान चळवळीमध्ये रक्तदात्यांचे योगदान महत्त्वाचे असून त्यामुळेच रक्तदान यशस्वी होत आहे असे उद्गार काढले.

  यावेळी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे, माजी नगरसेवक विनोद पलंगे,मुख्याध्यापक  गणेश रोचकरी, रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र  गिड्डे  पत्रकार प्रशांत कावरे, सोमनाथ इंगळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय जाधव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित कदम चिवचिवे, कोचिंग क्लास असोसिएशनचे आप्पासाहेब  सुरवसे,प्रा. अजित शेख खुटपडे सदानंद अलुरकर एडवोकेट विश्वास डुयफुडे, सुरेश कुलकर्णी, माणिक नाईकवाडी ,जगदीश पलंगे, सेवानिवृत्त अभियंता मोहन कांबळे,डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. हरिश्चंद्र गलियाल, जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे,बालाजी कामे, रामेश्वरा आपूने, विश्वजीत  कदम ,दामू घागरे, धनंजय कावरे, श्रीमती निर्मला कावरे ,श्रीमती केशरबाई कावरे, उज्ज्वला  जोशी, स्वाती कावरे ज्योती बिडवे, उपस्थित होते. प्रस्ताविक प्रा. समीर माने यांनी केले.

सुत्रसंचलन ओम कावरे यांनी केले. आभार औदुंबर कावरे यांनी मानले.
 
Top