मुरुम,  दि. ९ : 


कंटेकूर, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवार  रोजी बेळंब केंद्रात शिक्षण परिषदेचे औचित्य साधून राष्टपती शिक्षक पुरस्कार, जिल्हा आदर्श ग्रामसेवक, तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, ग्रामसेवक यांचा सरपंच गोविंद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जिवराज पडवळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरहरी धुमाळ, उपाध्यक्षा अनिता दासे, ग्रामपंचयात सदस्या अनिता स्वामी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राम जमादार यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री. महालक्ष्मी प्रतिमा, सुभाष वैरागकर संपादित आविष्कार काव्यग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. 


या वेळी गोविंद पाटील, जिवराज पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले तर सत्कारमुर्ती उमेश खोसे, भक्ती हंगरगे, तनुजा गाडवे यांनी या सन्मानाबद्ल काम करण्यास अधिक प्रेरणा मिळते अशा भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या सत्रात शिक्षण परिषदेत किशोर चौधरी (बाला उपक्रम), लक्ष्मण येवते (मुल्यमापन पध्दती), गोविंददास बैरागी (आँनलाईन प्रशासकीय कामकाज) आदी विषयीवर मार्गदर्शन केले. केंद्रिय मुख्याध्यापक नागनाथ येवते (बेळंब), सुर्यकांत राठोड (कोथळी), सुधीर येवते (कदेर) व केंद्रातील दहावी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कमलाकर मोटे यांनी केले. सुत्रसंचलन लक्ष्मण येवते तर आभार शिवकुमार स्वामी यांनी मानले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शिक्षक गोविंद जाधव, विठ्ठल कुलकर्णी, संध्या कलशेट्टी, बबिता निंबाळकर, सविता स्वामी, रुक्मीण जमादार, डिगंबर दासे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top