काटी ,दि . २२
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ब्राह्मण गल्लीतील जोगेश्वरी भैरवनाथ मंदीराचा जिर्णोद्धार ब्राह्मण समाजातील तरुण एकत्रित येऊन लोकसहभागातून जवळपास बारा लाख खर्चून जिर्णोद्धार करण्यात आला आहे.
हल्लीची तरुणाई मोबाईल नेटवर्कींगच्या माध्यमातून नको असलेले स्वीकारत असताना गावातील तरुणांनी जर मनावर घेतले तर मंदीराच्या जिर्णोद्धारा सारखे किंवा कोणतेही काम सहजपणे होऊ शकते याचा प्रत्यय काटी गावात येत आहे. या जिर्णोद्धार झालेल्या जोगेश्वरी भैरवनाथ मंदीरात शनिवार दि.(23) रोजी श्री जोगेश्वरी भैरवनाथ कालाष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून या धार्मिक कार्यक्रमात शनिवारी सकाळी 9 वा.भैरवनाथास अभिषेक करून दुपारी 12.30 वा.आरती नैवध्य होऊन सायंकाळी 6 वाजता महाप्रसादाचे वाटप होईल.रात्री 8 ते 10 या वेळेत जानकी नगर महिला भजनी मंडळ सोलापूर यांचे भारूड तर रात्री 10 ते 11 या वेळेत मयुरी दत्तप्रसाद कुलकर्णी व आदिती कुलकर्णी यांचे सुगम गायन त्यांना साथ संगत झंकार व शर्वरी कुलकर्णी यांची असणार आहे. तर रात्री 11ते 11.50 कु.सानिका व रसिका जतीन कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन असून विपूल कुलकर्णी व ज्ञानेश महाडीक हे साथ संगत करतील. रात्री 12 ते 12.30 श्री भैरवनाथ जोगेश्वरी यांचा शुभविवाह व आरती होईल.रात्री 12.30 पासून समस्त भजनी मंडळ काटी व महिला भजनी मंडळ काटी यांचा हरिजागर होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.