नळदुर्ग , दि . ०७
उन्हाचा वाढत चाललेला पारा. नळदुर्ग बसस्थानकावर भर उन्हात येणाऱ्या प्रवाशाना पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीच्या वतीने व युवा कार्यकर्ते करण मधुकराव लोखंडे मित्र परिवारा़च्या सौजन्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त नळदुर्ग बसस्थानकात पाणपोई सुरु करण्यात आली असून या पाणपोईचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, माजी सैनिक मधुकराव लोखंडे, पो.काँ.आर.पी. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलताना रिपाइंचे बाबासाहेब बनसोडे म्हणाले की, एकेकाळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्यग्रह केला होता. याची जाणीव ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग बसस्थानकात पाणपोई सुरु केली आहे. नळदुर्ग हे जवळपास६५ गावांच्या केंद्रस्थानी राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते.येथे तहानलेल्या प्रवाशांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय या पाणपोईमुळे झाली आहे.
याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,जयंती कमेटीचे खजीनदार योगेश सुरवसे ,अमर बनसोडे,प्रदिप बनसोडे अक्षय सुरवसे ,कुमार सुरवसे, प्रशिक बनसोडे,सुरज कांबळे, कुणाल गवळी,विश्वास बनसोडे,गणेश बनसोडे,राकेश बनसोडे,सुरज दिपक कांबळे ,विकी कांबळे, बारक्या कांबळे, अमोल कांबळे ,संतोष, कांबळे अकाश आडे, संजय घोडके आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.